कोरोनामुळे कंपनीचा निर्णय- देशभरात लागू होणार सुविधा
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोना महामारीच्या दरम्यान जीवन विमा निगम (एलआयसी) विमाधारकांसाठी विशेष सुविधा लागू करण्यात येणार आहे. यामध्ये विमाधारकांसाठी मॅच्युरिटी क्लेमशी संबंधीत असणारी कागदपत्रे देशातील कोणत्याही एलआयसी कार्यालयामध्ये जमा करता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
कंपनीने हा निर्णय कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घेतला आहे. आजवर देशभरात एलआयसीने 29 कोटीपेक्षा अधिकच्या पॉलिसांची विक्री केलेली आहे. विमाधारकांना यापुढे क्लेमची कागदपत्रे ही एलआयसीच्या देशभरातील 113 विभागीय कार्यालये, 2048 शाखा, 1526 सॅटेलाईट कार्यालये आणि 74 ग्राहक झोन आदींमध्ये जमा करता येणार आहेत.
डिजिटल माध्यम
ग्राहकांना देशातील वेगवेगळय़ा एलआयसी कार्यालयांमध्ये डिजिटल माध्यमातून कागदपत्रे पाठविण्याचीही सेवा मिळणार आहे. साधारणपणे क्लेम पेमेंट फक्त सर्व्हिसिंग शाखांमध्ये सादर करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे.
प्रत्येक कार्यालयात एक अधिकारी
कंपनीने ग्राहकांना सुविधा देण्यासाठी प्रत्येक कार्यालयामध्ये विशेष अधिकाऱयांची नियुक्त केली आहे. यामधून ग्राहकांना देशातील कोणत्याही कार्यालयात जाऊन संबंधीत विभागातून सविस्तर माहिती उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. सदरची सेवा ही प्रायोगिक पातळीवर उपलब्ध करण्यात येणार असून याचा कालावधी फक्त 31 मार्चपर्यंत राहणार असल्याचे एलआयसीने सांगितले आहे.