दोन बोगद्यांची होणार निर्मिती -कंत्राटासाठी 5000 कोटी रुपयाची रक्कम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी लार्सन ऍण्ड टुब्रो (एल ऍण्ड टी)ला शुक्रवारी चेन्नई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून 5,000 कोटी रुपयाचे कंत्राट मिळाले आहे.
अधिकच्या उपलब्ध माहितीनुसार कंपनीला चेन्नई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (सीएमआरएल) जवळपास 12 किलोमीटरचे दोन बोगदे निर्माण करण्यासाठी कंत्राट मिळाले आहे. कंत्राटा अंतर्गत केल्लिस स्टेशनसह तारामणी रोड जंक्शनपर्यंतचा मार्ग तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. लार्सन ऍण्ड टुब्रोने दिलेल्या माहितीनुसार चेन्नई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून आणखी एक आठ किलोमीटरसाठी खांबावरील रेल्वेलाईनची उभारणी करण्याचे कंत्राट मिळाले आहे.