वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
पेट्रोलियम ऍण्ड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड (पीएनजीआरबी) यांच्याकडून एक नोटीस सादर करण्यात आली असून याअंतर्गत लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) स्टेशन सुरु करण्याची प्रक्रीया अगदी सोपी होणार आहे. या प्रक्रियेसाठी आता कोणत्याही प्रकारचा सिटी गॅस वितरण परवाना नसला तरी चालू शकते.
पेट्रोलियम ऍण्ड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्ड ऍक्टच्या नियमानुसार एलएनजी स्टेशनची स्थापना ही कोणत्याही ठिकाणी स्थापना करता येणार असल्याचे 2 जून रोजी सादर करण्यात आलेल्या नोटीसीमधून स्पष्टीकरण दिले आहे. परंतु एलएनजी स्टेशन स्थापन केल्यानंतर कायद्यासोबत अन्य नियमांचे पालन करणे बंधनकारक ठरणार असल्याचे म्हटले आहे.
खासगी कंपन्यांना लाभ शक्य
रेग्युलेटरीकडून हा मोठा निर्णय सादर करण्यात आला असून देशामध्ये एलएनजी स्टेशन सुरु करण्यासोबतचा असणारा भ्रम दूर होणार असून आता पेट्रोनेट एलएनजीसारख्या खासगी कंपन्यांना एलएनजी स्टेशन्स उभारण्याची प्रक्रिया सोपी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.