स्क्रीन घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे फिरण्याची सोय : एलजीच्या एक्सप्लोरर प्रोजेक्टला प्रारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एलजी कंपनीने लवकरच आपल्या एक्सप्लोरर प्रोजेक्टला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे. नवीन स्मार्टफोनला विशेष आणि वेगळय़ा प्रकारच्या युजेबिलिटी एक्सपीरियन्ससोबत आणलं जाणार आहे. यामध्ये नव्या वैशिष्टय़ांसह पहिला नवाकोरा फोन येत्या 14 सप्टेंबरला सादर करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 14 सप्टेंबरच्या सकाळी 10 वाजता (भारतामध्ये 7.30 सायंकाळी) एलजी मोबाईल ग्लोबल फेसबुक आणि युटय़ूब चॅनेलवर वर्चुअली फोनचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
कंपनीने एक टीजर व्हीडीओही सादर केला आहे, यामध्ये हॅण्डसेट रोटेटिंग स्क्रीन आणि डब्बल स्क्रीन एक्सपीरियन्ससोबत असल्याचे पहायला मिळते आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नवीन प्रोजेक्टचा उद्देशच सध्याच्या ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देत त्यांचा फोन वापराकडे कल वाढविण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
30 सेकंदाचा व्हीडीओ टीजर
एलजीने आपल्या ग्लोबल युटय़ूब चॅनेलवर 30 सेकंदाचा व्हीडीओ सादर केला आहे. यामध्ये फोनची डब्बल स्क्रीन घडय़ाळाप्रमाणे फिरणारी असून याला टी शेप डिझाईन बनविण्यात आले आहे. हा अनोखा फॅक्टर मागील आठवडय़ात एक लिंक व्हीडीओमधून समोर आला आहे.