सेऊल
दक्षिण कोरीयाची होम अप्लायन्सेस कंपनी एलजीने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आपला पहिलावहिला रोलेबल (गुंडाळणारा) टीव्ही लाँच केला आहे. अनोख्या आणि सर्वात प्रथम दाखल केल्या जाणाऱया या टीव्हीची किमत 64 लाख रुपये असणार आहे. कंपनीने सदरचा टीव्ही सध्याला आपल्या स्थानिक बाजारात उतरवला आहे. इतर देशात हा टीव्ही लाँच करण्याबाबतचा निर्णय अद्याप निश्चित करण्यात आलेला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. प्रत्येक देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्या त्या देशात लाँचिंगविषयीचा निर्णय अंमलात आणला जाणार आहे.