नवी दिल्ली
टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांच्या संपत्तीत दोन दिवसात मोठी घट झाली असल्याची बाब समोर आली आहे. मस्क यांच्या संपत्तीत 50 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. सलग दुसऱया दिवशी बाजारात टेस्ला इन्कचे समभाग घसरले आहेत. त्यांनी ट्वीटर चाहत्यांना समभाग विकण्याबाबत सल्ला विचारला होता. त्यावरून त्यांना हा फटका बसल्याचे समजते. चाहत्यांच्या प्रतिक्रीया येण्याआधी बंधू किंबल यांनी समभाग विकले.