प्रतिनिधी / बेळगाव
येथील एचआयव्ही बाधित मुलांचे संगोपन करणाऱया नंदन मक्कमधाम अनाथाश्रमाला दिवाळीनिमित्त एल्गार सामाजिक साहित्य परिषदेतर्फे फराळ वाटप करण्यात आले. परिषदेच्या सदस्यांनी सदाशिवनगर येथील आश्रमाला नुकतीच भेट देऊन अनाथ मुलांबरोबर दिवाळी साजरी केली.
यावेळी अनाथाश्रमातील मुलांबरोबर गप्पा मारल्या. त्यांच्या इच्छा, स्वप्ने याविषयी विचारपूस केली. शिक्षणात खंड न पाडता शिक्षण अखंडपणे सुरू ठेवावे, याविषयी मार्गदर्शन केले. मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी एल्गार सामाजिक साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी, बेळगाव उपाध्यक्ष चंद्रशेखर गायकवाड, सचिव प्रा. निलेश शिंदे, प्रा. रवळनाथ यळ्ळूरकर, रान फिल्म प्रॉडक्शनचे डायरेक्टर नारायण पाटील, सुधीर लोहार आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.