नवी दिल्ली
एल अँड टी इन्फोटेक येणाऱया काळात 4 हजार 500 हून अधिक उमेदवारांना भरती करून घेणार आहे. आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी कंपनी सदरची भरती करणार असल्याचे समजते. आर्थिक वर्ष 2022 पर्यंत वरील संख्येने उमेदवारांना भरती केलं जाणार आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीने 3 हजार जणांना भरती करून घेतलं होतं. मुंबईत मुख्य कार्यालय असणाऱया या आयटी फर्ममध्ये एकूण 38 हजार 300 जण कार्यरत आहेत.