वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंजिनिअरिंग आणि कंस्ट्रक्शन क्षेत्रात कार्यरत असणारी देशातील प्रमुख कंपनी लार्सन ऍण्ड टुब्रोला (एल ऍण्ड टी) सेना दलाकडून मोठी ऑर्डर मिळली आहे. कंपनीने मात्र या ऑर्डरसाठी देण्यात आलेल्या मूल्यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. परंतु या प्रकल्पासाठी वर्गवारी करण्यात आलेली रक्कम मात्र 2,500 कोटी ते 5,000 कोटी रुपयाच्या दरम्यान असल्याचे सांगितले आहे.
एल ऍण्ड टी कंपनी स्मार्ट वर्ल्ड ऍण्ड कम्युनिकेशन व्यवसायासाठी आर्म फोर्स नेटवर्कसाठी अत्याधुनिक सुविधा तयार करणार आहे. देशभरात ऑपर्रेट करण्याठीही ऑर्डर मिळाली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून विविध संवेदनशील प्रकल्प देण्यात आल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन. सुब्रम्हयम यांनी सांगितले आहे. तसेच आम्हाला गर्व आहे की, संरक्षण मंत्रालयाने आमच्यावर विश्वास दाखविल्याबद्दल.
एल ऍण्ड टी ची कामगिरी
कंपनीच्या माहितीनुसार सदरचा प्रकल्प पूर्ण करण्यास 18 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यामध्ये तीन महिन्यांची वॉरंटी आण सात वर्षांपर्यंत देखभाल करण्याचे कंत्राट मिळाले आहे.