वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लार्सन ऍण्ड टुब्रो (एल ऍण्ड टी) या कंपनीचा उत्तराखंडमधील सिगोली ते भटवारी या ठिकाणी असणाऱया 99 मेगावॅटच्या पवनऊर्जा प्रकल्पामधील संपूर्ण हिस्सेदारी रिन्यू पॉवर सर्व्हिसेज प्रायव्हेट लिमिटेडला विकणार आहे, अशी माहिती मंगळवारी कंपनीने दिली आहे.
एल ऍण्ड टीला याकरीता पूनर्गुंतवणूकमधून 1,001.50 कोटी रुपये मिळणार आहे. खरेदीसाठी करार करण्यात आला असून नियम व अटी पूर्ण करण्यात आल्यानंतर हिस्सेदारीच्या विक्रीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
एल ऍण्ड टीने उत्तराखंडच्या सिंगोली-भटवारी या प्रकल्पातील 3 पट 33 मेगावॅट (एकूण 99मेगावॅट) पवनऊर्जा प्रकल्पामधील 100 टक्के हिस्सेदारीमध्ये पूनर्गुंतवणूक केली आहे.