स्वच्छ आणि सुंदर अंगणवाडींची निर्मिती झाल्याने कामाची प्रशंसा
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव तालुक्मयात तलावांबरोबर आता अंगणवाडी बालस्नेही बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बालस्नेही योजनेंतर्गत तालुक्मयातील अनेक अंगणवाडींना नवे रुप देण्यात येत आहे. याचीच पाहणी जिह्याचे प्रभारी सचिव एल. के. अतिक यांनी यांनी केली. यावेळी त्यांनी कामाची प्रशंसा केली आहे. त्यामुळे आता अधिकाऱयांतूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतीमार्फत या बालस्नेही अंगणवाडय़ांच्या कामांना चालना देण्यात आली आहे. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यांनी स्वतः भेटी देऊन अंगणवाडय़ांना बालस्नेही बविण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. तालुक्मयातील प्रत्येक अंगणवाडीला बालस्नेही बनविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱयांचे कौतुक बेळगाव तालुक्मयातील विविध भागांमध्ये पाणी अडविण्याच्या दृष्टिने आता मोठय़ा प्रमाणात पाऊल उचलण्यात येत आहे. परिणामी अनेक तलावांची खोदाई करून त्यामध्ये पाणी साठविण्याचे काम करण्याची धडपड सुरू आहे. यापूर्वी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहाच्या कार्यक्षेत्रातही दोन तलावांची निर्मिती करण्यात आली होती. तेथेही जिह्याचे प्रभारी सचिव एल. के. अतिक यांनी पाहणी करून कामांची प्रशंसा केली आहे. आता बालस्नेही अंगणवाडय़ांना भेट देऊन त्यांनी अधिकाऱयांची पाठ थोपटली आहे. बेळगाव तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात तालुका पंचायत व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून विकासकामे करण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या कामांना चालना मिळाली असून हिंडलगा व इतर गावांमध्ये अतिक यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. व शिक्षण खात्यातील इतर अधिकारी उपस्थित