बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने केएसआरटीसी, केकेआरटीसी, एनडब्ल्यूकेआरटीसी ने एसएसएलसी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बंगलोर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने (बीएमटीसी) विद्यार्थ्यांना त्यांच्या बसमधून मोफत सेवा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान, बीएमटीसीने एसएसएलसीच्या विद्यार्थ्यांना बीएमटीसीच्या सामान्य सेवांमध्ये विनामूल्य सेवा देण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या निवासस्थानातून परीक्षा केंद्रापर्यंत मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे,” असे मंगळवारी त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान राज्य सरकारने राज्यभरात १९ ते २२ जुलै या कालावधीत एसएसएलसी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य प्रवासाची घोषणा केली गेली. परिवहन मंत्री लक्ष्मण सावदी यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान बसच्या वाहकाला एसएसएलसी परीक्षा हॉल तिकीट दाखवावे लागेल.
एसएसएलसी परीक्षा दोन दिवस घेतल्या जातील. एक पेपर १९ जुलै रोजी घेण्यात येणार आहे तर दुसरा पेपर २२ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. दोन्ही पेपर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या दरम्यान घेण्यात येणार आहेत.