के.आर. शेट्टी चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के.आर. शेट्टी चषक 13 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी एसकेई संघाने बीएससी संघाचा 4 गडय़ांनी तर विजया अकादमी संघाने बीएससी ब संघाचा 95 धावांनी पराभव करून 2 गुण मिळविले. पार्थ केळूसकर (एसकेई), स्वरूप साळुंखे (विजया) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
गुड शेफर्ड स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बीएससी संघाने 20 षटकांत 9 बाद 136 धावा केल्या. मोहिदने 47, अवधूतने 14 धावा केल्या. एसकेईतर्फे प्रवीणने 23 धावांत 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना एसकेई संघाने 20 षटकांत 6 बाद 137 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. त्यात पार्थ केळूसकरने 49, हर्ष नाशीपुडीने 32 धावा केल्या.
दुसऱया सामन्यात विजया अकादमी संघाने 25 षटकांत 8 बाद 195 धावा केल्या.
स्वरूप साळुंखेने 80, अनिषने 25 धावा केल्या. बीएससी ब तर्फे सर्वेशने 48 धावांत 4, साक्षीने 25 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीएससी ब संघाने 20 षटकांत 9 बाद 100 धावा केल्या. त्यात क्रिशने 19, यशोधनने 17 धावा केल्या. एसकेईतर्फे गौरवने 7 धावांत 2, हमजाने 10 धावांत 2 गडी बाद केले.