प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या 77 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असलेल्या एसकेई सोसायटीच्या सांस्कृतिक अकादमीचे थाटात उद्घाटन करण्यात आले. ही सांस्कृतिक अकादमी एसकेई परिवारातील सर्व महाविद्यालयांतील आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक वरदान ठरणार आहे. या अकादमीमध्ये नाटय़, गायन, वादन, नृत्य, व्यक्तिमत्त्व विकास आदी बाबींचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी सांस्कृतिक अकादमीच्या उपाध्यक्षा बिंबा नाडकर्णी व डॉ. अनुजा नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सेवंतीलाल शहा, उपाध्यक्ष व्ही. एल. आजगावकर, सचिव राज देशपांडे, मधुकर सामंत, व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, सदस्य पंकज शिवलकर, लता कित्तूर, ज्ञानेश कलघटगी यासह कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. संध्या देशपांडे, धनश्री गुरव, अनुजा क्षिरसागर, संतोष गुरव, योगेश रामदास यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रार्थना या सर्वधर्म समावेशक बहारदार कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.