कुठे प्रवाशांना साखर वाटली तर कुठे बसेसला हार घालून पुजन
प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला दि. 1 जून रोजी 75 वर्ष पूर्ण झाली. त्याबद्दल सातारा जिह्यातील 11 आगारात उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या काळानंतर येणारा हा एसटीचा वर्धापन दिन सर्वच जिह्यातील आगारांमध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कर्मचाऱयांनी बसेसला फुलांचा हार बांधून, पूजन करुन सुरुवात करण्यात आली. प्रवाशांना साखर वाटण्यात आली.
एसटी महामंडळाच्या 75 वा वर्धापन दिन बुधवारी साजरा करण्यात आला. कोरोना काळात एसटी महामंडळाच्या सर्वच कर्मचाऱयांनी चांगले काम केले. त्यानंतर संपाचा कालावधी गेल्यानंतर पुन्हा साताऱयात सर्वच आगारातील बस सेवा पूर्ववत होऊ लागली. प्रवाशांनीही एसटीलाच पसंती दिली गेली आहे. त्याप्रमाणे सातारा, पाटण, फलटण, दहिवडी, वडूज, महाबळेश्वर, कोरेगाव, खंडाळा, मेढा या आगारातील कर्मचाऱयांनी सकाळीच आपले आगाराची स्वच्छता करुन आगारात रांगोळय़ा काढून प्रवाशांचे स्वागत साखर व पेढे देऊन करण्यात आले. तसेच बसेसना फुलांचे हार घालून बसची पुजा करण्यात आली. त्यानंतर बसेस मार्गस्थ करण्यात आली. प्रवाशांनाही या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा एसटी कर्मचाऱयांनी दिल्या. तर एसटी कर्मचाऱयांनाही प्रवाशांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.