प्रतिनिधी / कोल्हापूर
एसटीचे विलिनीकरण करावे या मागणीसाठी कोल्हापूर आगारातील कर्मचाऱयांचा संप सुरू आहे. या संपामध्ये सहभागी झालेल्या 40 रोंजदार कर्मचाऱयांना बुधवारी (17 रोजी) नोटीसा काढण्यात आल्या होत्Îा.. नोटीसा मिळाल्यापासून 24 तासात कामावर हजर व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. आवाहन करून देखील कामावर हजर न झालेल्या 14 चालक -वाहक रोजंदार कर्मचाऱयांची सेवा समाप्ती मंगळवारी करण्यात आली आहे अशी माहीती कोल्हापूर आगारातील सूत्राकडून सांगण्यात आले.
एसटी संपामुळे कोल्हापूर आगारातील कर्मचारी संपामध्ये उतरले आहेत. या संपामधून आजअखेर कोणताच तोडगा निघालेला नाही. एसटीचे विलिनीकरणावर व्हावे यावर हे कर्मचारी ठाम आहेत. यापूर्वी कोल्हापूर आगारातील 53 कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. तर 40 रोंजदार कर्मचाऱयांना कामावर हजर होण्याच्या नोटीसा काढण्यात आल्या होत्Îा. ही नोटीस कर्मचाऱयांच्या हातात मिळाल्यापासून 24 तासात हजर व्हावे असा आदेश होता. यामध्ये गट क्रमांक एक मधील डेली वेजीस व गट क्रमांक दोन मधील चालक व वाहकांचा समावेश आहे.