प्रतिनिधी / सातारा :
दिवाळीपूर्वी प्रलंबित वेतन मंजर करावे, वाढीव महागाई भत्त्याच्या मागणीसाठी परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी या बेमुदत उपोषणात सहभाग दर्शविला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे उपोषण मागे घेण्यात येणार नसल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांच्यावतीने सांगण्यात आले.
यावेळी 1 एप्रिल 2016 पासून शासनाने लागू प्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता मंजूर करावा, वार्षिक वेतन वाढ द्यावे, घरभाडे भत्ता ही सर्व रक्कम एकरकमी दिवाळी पूर्वी देण्यात यावी, मागणी संयुक्त कृती समितीच्यावतीने मागणी करण्यात आली. यावेळी विविध 18 संघटना एकत्रित येऊन बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.