प्रतिनिधी / दापोली
एसटी कामगारांचा प्रश्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तो आपण येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे सूतोवाच दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी दापोली येथे केले.
सध्या राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळ सरकारमध्ये विलगीकरण व्हावे याकरिता हे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दापोली आगारातील एसटी कर्मचारी हे ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. त्यांना आमदार योगेश कदम यांनी नुकतीच भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.