700 कर्मचारी कामावर हजर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आह़े 17 डिसेंबर रोजी जिह्यात तब्बल 16 हजार 283 प्रवासी नोंद एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून करण्यात आली. फेऱयाच्या संख्या वाढत असतानाच प्रवासी संख्याही चांगलीच वाढली आह़े सर्वाधिक प्रवासी संख्या 4 हजार 778 ही दापोली आगारातून झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
जिह्यात आता एकूण 700 हून अधिक कर्मचारी कामावर हजर झाले आहेत़ दरम्यान, एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, यासाठी संप सुरू असतानाच जिह्यात शनिवारी 300 हून अधिक फेऱया सुरू करण्यात प्रशासनाला यश आल़े सर्वसामान्य लोकांना एसटीच्या फेऱयांबद्दल माहिती होत असल्याने प्रवासी एसटीला पसंती देत आह़े ग्रामीण भागामध्ये खासगी वाहतुकीमधून होणाऱया लुटीमुळे नागरिक हैराण झाले आहेत़ त्यामुळे एसटीचा दिलासा प्रवाशांना मिळत आह़े
रत्नागिरी विभागातील 17 डिसेंबरची प्रवासी संख्या
आगार प्रवासी संख्या
मंडणगड 177
दापोली 4778
खेड 1559
चिपळूण 2510
गुहागर 53
देवरूख 4297
रत्नागिरी 35
लांजा 317
राजापूर 2554
एकूण 16283