प्रतिनिधी / कोल्हापूर
या गोंधळाशी लवकर यावे जगंदबा…. अशी साद घालत एसटी कर्मचाऱयांचा संप लवकर मिटू दे आणि त्यांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण होवो, अशी आई अंबाबाई चरणी प्रार्थना बुधवारी युवाशाहिरांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आंदोलनास बसलेल्या एसटी कर्मचाऱयांच्या समर्थनात केली. जागर, गोंधळाच्या माध्यमातून राज्य शासनाला एसटी कर्मचाऱयांप्रती सद्बुद्धी देवो, अशी भावना व्यक्त केली. कोल्हापुरात सुरू असलेल्या संपाच्या तिसऱया दिवशीही आंदेलक कर्मचारी ठिय्या मारून बसले होते.
युवाशाहीर युवराज अंगदबावे, युवाशाहीर अनिरुद्ध कोळी, सौरभ कोळी, शंकर वाघे यांनी देवीगीतामधून एसटी कर्मचाऱयांना शासनामध्ये सामील करून घेण्याचे आवाहन केले. तब्बल पाऊण तास जागर सुरू होता. यावेळी कर्मचाऱयांनी शासनाविरेधात निषेधाच्या घोषणा दिल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कोल्हापूर पोलीस दल सीसीटीव्ही सर्वेअलन्स व्हॅन उभी होती. दुपारपर्यंत विविध संघटनांसह मराठा महासंघ, वंचित बहुजन विकास आघाडी, लहुजी क्रांतीकारी संघटना, एसटी निवृत्ती कर्मचारी संघटना यांनी संपाला पाठिंबा दिला. इचलकरंजी आगारातील चालक वसंत कांबळे यांनी गाण्यामधून आणि पाच वर्षांपासून इचलकरंजी-कोल्हापूर प्रवास करणाऱया दीपक कुलकर्णी या तरुणानेही या संपाला पाठिंबा दिला.
फक्त खणखणतोय फोन...
मध्यवर्ती बसस्थानकामध्ये तुरळक प्रवासी दिसत होते. वाहतूक नियंत्रक कक्षात फोन सतत खणखणत राहतोय. तेथे एकच महिला कर्मचारी कार्यरत होती. संप असूनही काही प्रवासी नियंत्रक कक्षात बसगाडÎांसंदर्भात विचारणा करत होते. मात्र संप मिटत नाही तोपर्यंत आम्ही काहीही सांगू शकत नाही, असे तेथील उपस्थित कर्मचारी सांगत आहेत. नेहमी गजबजणारा हा परिसर शांत होता.
एसटीची पार्सलसेवा ठप्प; नागरिक,व्यापाऱ्यांची गैरसोय
तीन दिवसांपासून एसटी सेवा ठप्प झाल्याने पार्सल सुविधाही बंद झाली आहे. दररोज जवळपास शंभर-दोनशे पार्सल बाहेर पाठवल्या जातात. मात्र संपामुळे सर्वकाही थांबले आहे. विशेषत: मुंबई-पुणे, कोकण या भागात मोठ्या प्रमाणात पार्सलसेवा जाते. बंदमुळे नागरिक, व्यापाऱयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याची माहिती गुणिना कमर्शियलचे प्रतिनिधी रहीम सनदी यांनी दिली.