पतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी एसटी महामंडळामार्पत संपकरी कर्मचाऱयांवर बडतर्फ कारवाईचा बडगा चालूच आहे. सोमवारी देखील आणखीन दापोलीतील 6 एसटी कर्मचाऱयांना बडतर्फ करण्यात आले. 18 जानेवारीपर्यंतच्या देण्यात आलेल्या अहवालानुसार 96 एसटी बसफेऱया सुरू झाल्या आहेत.
एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचाऱयांनी भूमिका ताठ ठेवल्याने हा संप कधी मिटणार, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. रत्नागिरी विभागात कार्यरत असलेल्या 3679 एसटी कर्मचाऱयांपैकी गेल्या तीन दिवसांपूर्वी या संपात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या 2,866 कर्मचाऱयांची सख्या आता 18 जानेवारी पर्यंत 2840 पर्यंत आली आहे. या संपात सहभागी कर्मचाऱयांवर उगारलेल्या बडतर्फीची कारवाई कायम सुरू आहे.
बडतर्फ कर्मचाऱयांची संख्या 39
गेल्या शनिवारी 27 कर्मचाऱयांना बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर पुन्हा 32 कर्मचाऱयांना बडतर्फ करण्यात आले होते. आता ही बडतर्फीची संख्या 39 इतकी आहे. त्यामध्ये दापोलीतील 6 कर्मचाऱयांचा समावेश आहे. सुरू झालेल्या बसफेऱयांतही सोमवारी वाढ झालेली दिसून आली असून 96 बसफेऱया सुरू आहेत. त्यामध्ये दापोली 17, खेड 12, चिपळूण 18, देवरूख 24, गुहागर 2, रत्नागिरी 3, लांजा 3, राजापूर 15, मंडणगड 2 इतक्या बसफेऱयांचा समावेश आहे.