बेळगाव / प्रतिनिधी
एसपीएम रोड येथे स्मार्ट सिटीअंतर्गत व्हाईट टॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले असून, यामध्ये सोमवारी एक ट्रक अडकला होता. चिखल असल्यामुळे हा ट्रक बाहेर काढणे अशक्मय झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर परिश्रम करून हा ट्रक बाहेर काढण्यात आला. यामुळे रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती.
शहरातील अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. परंतु या कामामध्ये एकवाक्मयता नसल्यामुळे संथगतीने काम सुरू आहे. एसपीएम रोडवरदेखील एका बाजूचे काम पूर्ण होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप दुसऱया बाजूच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अवजड वाहने जाणे अशक्मय झाले आहे. यामुळे वाहने न्यायची तरी कोठून, असा प्रश्न या वाहनचालकांच्या समोर उभा ठाकला आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणारा ट्रक चिखलात अडकला. चिखलातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नामध्ये हा ट्रक एका बाजूला कलंडत गेला. यामुळे मागून येणाऱया वाहनांची कोंडी झाली. अखेर प्रयत्न करून हा ट्रक बाहेर काढण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत झाली.