मुंबई
देशातील सर्वात मोठी सर्वाजनिक क्षेत्रातील बँक असणाऱया स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आपल्या 65 व्या स्थापना दिवसांचे औचित्य साधून योनो शाखेचा प्रारंभ केला आहे. एसबीआयचा इंटीग्रेटेट डिजिटल आणि लाइफस्टाईल प्लॅटफार्म योनो बँकींग इंडस्ट्रीमध्ये ग्राहकांना मानव संवाद आणि डिजिटल इंटीग्रेशन यांना एकत्रित करुन चांगली सेवा देण्यासाठीचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. प्रारंभीच्या काळात सदर योनो शाखा या तीन शहरांमध्ये सुरु करण्यात आल्याअसून यामध्ये नवी मुंबई, इंदौर आणि गुरुग्राम या शहरांचा समावेश आहे. तर अन्य ठिकाणी टप्प्याटप्याने हा प्रकल्पा राबविण्यात येणार असून आणि ग्राहकांच्या प्रतिसादावर निश्चित होणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.