5 मार्च रोजी होणार बंद : 10 हजार कोटी जमविण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली : एसबीआय कार्ड्सचा आयपीओ सोमवारपासून सुरू झाला असून, हा 5 मार्चला बंद होणार आहे. भारतीय स्टेट बँकेच्या कार्ड आणि पेमेंट सुविधा युनिटने गुंतवणूकदारांकडून 2,769 कोटी रुपये जमविले आहेत. एसबीआय आयपीओच्या प्रारंभापूर्वी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी याची सदस्यता घेतली आहे. 12 म्युच्युअल फंड आणि 74 गुंतवणूकदारांनी एसबीआय कार्ड्सच्या आयपीओमध्ये 755 रुपये प्रतिशेअरच्या भावाने 3.67 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत, अशी माहिती रेग्युलेटरी फायलिंगमधून देण्यात आली आहे. रिटेल इन्वेस्टर्ससाठी या आयपीओची सदस्यता घेण्याची संधी सोमवारपासून सुरू झाली आहे.
एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्विसेससाठी 750-755 रुपयांचा प्राईस बँड निवडण्यात आला आहे. एसबीआय कार्ड्ससाठी किमान लॉट साईज 19 इक्विटी शेअर्स ठेवण्यात आली आहे. तर याच्या पटीत गुंतवणूकदार अधिकाधिक आपल्या सुविधेनुसार पर्याय निवडू शकतात. म्हणजेच कमीत कमी 19 इक्विटी शेअर्सही निवडता येऊ शकतात. एसबीआय कर्मचाऱयासाठी प्रति शेअर 75 रुपयाच्या सवलतीत घेण्याची संधी आहे. प्राथमिक बाजारातून 10,350 कोटी रुपये जमविण्यासाठी एसबीआय कार्ड्सचा आयपीओ 2 मार्चपासून 5 मार्च पर्यंत सलग चार दिवसांसाठी सुरू राहणार आहे. यात 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर सहभागी होतील आणि याचबरोबर प्रमोटर सुमारे 13 कोटी शेअर विक्रीसाठी ठेवतील. प्रमोटर्स भारतीय स्टेट बँक आणि कार्लाइल ग्रुप अनुक्रमे 3.73 कोटी शेअर आणि 9.32 कोटी शेअरची विक्री करत आहेत. एसबीआय कार्ड्स आयपीओच्या प्रमुख व्यवस्थापकामध्ये कोटक महिंद्रा पॅपिटल, एसबीआय पॅपिटल मार्केट्स, डीसीपी मेरिल लिंच, ऍक्सिस पॅपिटल, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड पॅपिटल मार्केट्स आणि नोमुरा फायनान्सियल ऍडवायझरी अँड सिक्युरिटीज यांचा समावेश आहे.