नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणारी देशातील दिग्गज बँक म्हणून भारतीय स्टेट बँकेची (एसबीआय) ओळख आहे. येत्या काळात एसबीआय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह (एमएसएमई) प्राथमिकता असणाऱया क्षेत्रांना कर्जांच्या स्वरुपता सहाय्यता देण्याची तयारी करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये एसबीआय बिगर बँकिंग फायनान्स कंपन्यांची (एनबीएफसी) मदत घेणार असून त्याच्या मदतीने कर्ज पुरवठा करण्यावर भर देणार असल्याचे संकेत आहेत. एक सृजनशिल मॉडेल उभारणार असून याकरीता बँक आणि एनबीएफसी यांना एकत्रित लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे उद्योग क्षेत्रासाठी आयोजित केलेल्या ‘ग्लोबल एलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशिप’ (गेम) यामध्ये ऑनलाईन संबोधित करताना एसबीआय अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी स्पष्ट केले आहे. थकबाकी न मिळाल्याने आणि कर्जदारांवरील विश्वास कमी होण्यासोबतच यासारख्या अनेक कारणांमुळे लहान आणि मध्यम क्षेत्रातील उद्योगांसमोर पैशांची चणचण निर्माण होते असेही यावेळी सांगितले आहे. वास्तवामध्ये एमएसएमईसाठी कर्ज देण्याकरीता बहूतांश एनबीएफसी पुढाकार घेत नाहीत परंतू या बाबीवर संशोधन करण्याची आवश्यकता आहे. यासाठी विशेष योजनेची गरज असल्याचे अध्यक्ष खारा यांनी नमूद केले आहे.
Previous Articleसौदीचे कर्ज फेडण्यासाठी चीनकडून कर्ज
Next Article जानेवारीपासून लसीकरणाची तयारी ….
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.