अमेरिकेत उपाययोजनेसंबंधी होतोय विचार
वाहनांच्या हेडलाइटच्या आधुनिक तंत्रज्ञानाने रात्रीच्या आणि खराब हवामानावेळी वाहन चालविणे सोपे झाले आहे पण वाहनांमधून निघणाऱया तीव्र प्रकाशावर आता व्यापक स्तरावर प्रश्न उपस्थित होत आहेत. अमेरिकेत या समस्येवरून 14 हजार लोकांकडून ऑनलाईन याचिकाही दाखल करण्यात आली आहे. अमेरिकेतील एका एनजीओने 2016 मध्ये पहिल्यांदा हेडलाइटचे मानांकन जारी केले होते.
80 प्रकारच्या हेडलाइट्सपैकी केवळ एकाला चांगले मानांकन मिळाले होते. यंदा मार्चपर्यंत देण्यात आलेल्या मानांकनात केवळ 25 टक्के हेडलाइट्सना चांगले मानांकन मिळाले आहे. नॅशनल हायवे ट्रफिक सेफ्टी ऍडमिनिस्ट्रेशनने लोकांकडून यावर प्रतिक्रिया मागविण्यात आल्यावर 4 हजारांहून अधिक तक्रारी मिळाल्या ओत.
रात्रीच्या वेळी तीव्र प्रकाश मोठी समस्या निर्माण करते. रियर ह्यू मिररमधूनही जव्हा प्रकाश येतो, तेव्हा त्रास होतो असे 30 टक्के लोकांनी म्हटले आहे. तक्रारदारांपैकी 11 टक्के लोक 65 आणि त्याहून अधिक वयाचे होते. तर 45 टक्के लोक 35 ते 54 वर्षांचे होते.
भारतातही मोठी समस्या
भारतात 74 टक्के वाहने हायबीमचा अनावश्यक वापर करतात असे फॉर्च्यूनच्या अहवालात म्हटले गेले आहे. रात्री होणारे 33 टक्के अपघात हायबीम लाटइच्या चुकीच्या वापरामुळे होतात. हाय आणि लो बीममधील फरक न ओळखणारे अने लोक असल्याचा दावा रोड ऍक्सिडेंट फोरमने केला आहे.
स्वयंचलित तंत्रज्ञान
हाय बीम असिस्ट तंत्रज्ञानाने ही समस्या सोडविली जाऊ शकते. समोरून वाहन येण्याचे संकेत मिळताच हे तंत्रज्ञान लाइटला लो बीममध्ये बदलते. युरोपमध्ये एडप्टिव्ह ड्रायव्हिंग बीम टेक्नॉलॉजीचा वापर होतो. लाइटच्या डोळय़ांवरील प्रभावावर लक्ष देणे आवश्यक आहे.