नवी दिल्ली
सिमेंट निर्मिती क्षेत्रातील कंपनी एसीसी लिमिटेडने जून 2021 संपलेल्या दुसऱया तिमाहीत 569 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. जो दुप्पट वाढीचा ठरला आहे. सिमेंटच्या विक्रीत झालेल्या वाढीचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर दिसला आहे. तिमाहीचे आकडे जाहीर झाल्यावर शेअर बाजारात कंपनीच्या समभागाचा भाव दुपारी 12 वाजता 6.79 टक्के वाढीसह 2296 रुपयांवर होता. एक वर्षाच्या अगोदर एप्रिल-जून तिमाहीत 270 कोटी रुपयांचा नफा कंपनीने कमावला होता.