मुंबई
कच्च्या साहित्याच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे यंदा उन्हाळ्यात गारवा देणारे एसी अर्थात एअर कंडिशनर्स महागणार असल्याचे समजते. एअर कंडिशनर्सच्या किंमती 5 ते 8 टक्के इतक्या वाढणार असल्याने सांगण्यात येते. एसीसाठी लागणाऱया कच्या मालाच्या किंमती वाढवण्यात आल्याने परिणामी एसी निर्मात्या कंपन्यांना किंमती वाढवणे अपरिहार्य ठरणार आहे. 5 ते 8 टक्के इतक्या एसीच्या किंमती वाढणार आहेत. म्हणजेच रुपयात पाहता एसीच्या किंमती प्रत्येकी 1500 ते 2000 रुपये वाढ होणार आहे. पॉलीमर्स, कॉपर, स्टील व पॅकेजींग मटेरियलच्या दरातही वाढ झाली आहे. एसी, फ्रीज, कुलर्स, पंखे आदींच्या निर्मिती खर्चात वाढ होणार आहे.