क्षितीज प्रसादच्या चौकशीतून माहिती उघड, तिघांनीही केले दीपिकासोबत चित्रपटात काम
प्रतिनिधी / मुंबई
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनचा उलगडा झाल्यानंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर या बडÎा अभिनेत्रींची एनसीबीने कसून चैकशी केल्यानंतर या प्रकरणात आता बॉलीवूडमधील एस., आर. आणि ए. नावाने सुरू होणारे मोठÎा अभिनेत्यांची नावे समोर आली आहेत. धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितीज प्रसादच्या चौकशीतून या नावांची माहिती समोर आली आहे.
या सर्वांना चौकशीसाठी एनसीबी ठराविक अंतराने समन्स पाठविणार आहे.
या तीनही अभिनेत्यांनी दीपिका पदुकोणसोबत काम केले आहे. यामधील एस नावाचा अभिनेता हा 52 वर्षाचा आहे. ए नावाचा 47 वर्षाचा, तर आर नावाचा अभिनेता हा 37 वर्षाचा असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. हे अभिनेते सतर्क होऊन पुरावे नष्ट करू नये, यासाठी त्यांची नावे उघड केलेली नाहीत. दरम्यान, क्षितीजने न्यायालयात एनसीबी अधिकाऱयावर ठपका ठेवत त्यांनी थर्ड डिग्री देत मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
`ए’ नावाच्या अभिनेत्याचा एका क्रिकेटरशी संबंध
ए अक्षराने सुरू झालेल्या नावाचा अभिनेता ड्रग्ज घ्यायचा आणि संपर्कातील लोकांनाही ड्रग्ज द्यायचा. हा सुपरस्टार एका क्रिकेटरशीही संबंधित आहे. या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत जवळपास 18 जणांना अटक केली आहे. तर 58 मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलमधून अनेक धक्कादायक माहितींचा उलगडा झाला आहे. यामध्ये काही राजकीय नेत्यांचासुद्धा समावेश असल्याचे समोर आले आहे.