वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एस ऍण्ड पी ग्लोबल लवकरच आयएचएस मार्किटचे अधिग्रहण करणार असून सदरचा व्यवहार हा 44 अब्ज डॉलरमध्ये होणार असल्याची माहिती आहे. अधिग्रहाणाची रक्कम देण्यासाठी समभागांची अदला-बदल करण्यात येणार आहे. आयएचएस मार्किट समभागधारकांनी त्यांच्या प्रत्येक समभागासाठी एस ऍण्ड पी ग्लोबलचे 0.2838 समभाग मिळण्याचा अंदाज आहे.
संयुक्त कंपनीमध्ये एस ऍण्ड पी ग्लोबलच्या सध्याच्या समभागधारकांना जवळपास 67.75 टक्क्यांची हिस्सेदारी मिळणार आहे. परंतु लंडनच्या आयएचएस मार्किटच्या समभागधारकांना संयुक्त कंपनीमध्ये जवळपास 32.25 टक्क्यांची हिस्सेदारी प्राप्त होणार असल्याची माहिती आहे. अधिग्रहण व्यवहारात आयएचएस मार्किटचे एंटरप्राइजेस मूल्य 44 अब्ज डॉलरपेक्षा जास्त असून त्यामध्ये 4.8 अब्ज डॉलरच्या कर्जाचाही समावेश आहे. संयुक्त कंपनीचे मुख्यालय हे न्यूयॉर्कमध्ये होणार असून तेथे एस ऍण्ड पी ग्लोबलचेही मुख्यालय राहणार आहे. कंपनी लवकरच आपला विस्तार करणार आहे.
येत्या वर्षात पूर्ण होणार व्यवहार
सदरचा व्यवहार पूर्ण होण्यासाठी पुढील वर्षातील दुसऱया सहामाहीत पर्यंतचा कालावधी लागणार असल्याची माहिती आयएचएस मार्किटचे अध्यक्ष आणि सीईओ लांस उग्ला यांनी दिली आहे.