निवडणूक-शेतकऱयांच्या प्रश्नांवर साधला संवाद
प्रतिनिधी / हल्याळ
काँग्रेस पक्षाच्यावतीने बेंगळूर येथील म. गांधी पुतळय़ासमोर काँग्रेस राज्य अध्यक्ष (केपीसीसी अध्यक्ष) डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत शेतकरी विरोधी धोरण केंद्राकडून जारी झाल्याने निदर्शने करण्यात आली. यावेळी उत्तर कन्नड जिल्हय़ाचे एमएलसी एस. एल. घोटणेकर यांनी भाग घेऊन निदर्शने केली.
एमएलसी एस. एल. घोटणेकर यांनी केपीसीसी राज्य अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याशी सध्याच्या समस्येवर व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावर हल्याळ तालुक्यातील पॅरी साखर कारखान्याकडून अन्याय होत आहे. कारखान्याचे व्यवस्थापक मंडळ शेतकऱयांना योग्य भाव, उसाची वेळेत उचल न केल्याने शेतकऱयांना आर्थिक नुकसान होत आहे. या विरोधात मी शेतकऱयांच्या बाजूने आवाज उठविला आहे. आंदोलनाची व्याप्ती वाढविणार आहे. राज्य काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून यासाठी समर्थन मिळावे, असे मत घोटणेकर यांनी डी. के. शिवकुमार यांच्यासमोर मांडले. आता ग्रा. पं. निवडणुका प्रचार सुरू झाला आहे. काँग्रेसने मागील पाच वर्षांत जी विकासकामे केली आहेत. याचे विवरण नागरिकांसमोर व्यवस्थितपणे मांडावे, याबाबत वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य घेऊन ग्रा. पं. वर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकवा, अशी सूचना शिवकुमार यांनी केले.