ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपला परदेश दौरा अर्ध्यावरच संपुष्टात आणला आहे. संयुक्त राष्ट्रसुरक्षा परिषदेत भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर परराष्ट्रमंत्री मेक्सिको, पनामा आणि गुयाना या लॅटीन अमेरिकन देशांचा दौरा करणार होते. मात्र, त्यांनी हा दौरा रद्द केला आहे. ते आता न्यूयॉर्कहून थेट भारतात परतणार आहेत. सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.