वार्ताहर /कणकुंबी
ओलमणी येथील राजषी शाहू हायस्कूलचे शिक्षक ए. जे. सावंत यांना सर फाऊंडेशनच्या राष्ट्रीय पातळीवर नवोपक्रम स्पर्धेत नॅशनल अवॉर्ड देण्यात आले.
लोणावळा येथे झालेल्या स्टेट इंनोवशन अँड रिसर्च फौंडेशन महाराष्ट्र, भारत आयोजित राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धेत 2020-21, नॅशनल कॉन्फरन्समध्ये अजित सावंत, राजषी शाहू हायस्कूल ओलमणी यांना महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माजी अध्यक्षा शकुंतला काळे व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू यांच्या हस्ते शानदार कार्यक्रमांमध्ये नॅशनल अवॉर्ड प्रदान केला.
त्यांच्या आपत्कालीन काळात शिक्षक हाच शिक्षणाचा आधारवड. या उपक्रमाला सर फाऊंडेशनच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पारितोषिक देण्यात आले. या राष्ट्रीय rस्पर्धेत देशभरातून उपक्रम सादर केले होते. त्यातून नवोपक्रम अशा उपक्रमांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिटय़ूट येथे सर फाऊंडेशन महाराष्ट्राने नियोजनबद्ध व भव्य नियोजन केले होते. यावेळी सर फाऊंडेशनचे राज्य समन्वयक सिज्ञाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे महाराष्ट्र राज्यातील सर्व फाऊंडेशनचे जिल्हा निहाय समन्वयक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सिंहगड इन्स्टिटय़ूट लोणावळा या ठिकाणी दोन दिवसीय राष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. या कॉन्फरन्समध्ये विविध मान्यवरांनी विविध शैक्षणिक नाविन्यपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. कॉन्फरन्समध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत सरांना पुरस्कार प्रदान केला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.