क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी चषक 14 वर्षाखालील लीग क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी आनंद अकादमी ड्रॉपईन वॉरियर्स व देसाई वॉरियर्स यांच्यातील रंगतदार सामना तिन्ही स्पर्धेमध्ये प्रथमच सामना टाय झाला. तर दुसऱया सामन्यात ए. जे. स्पोर्ट्स बेळगावने सीसीआय ब्लू संघाचा 9 गडय़ाने पराभव केला. अष्टपैलू खेळी खेळलेल्या पियुष गोहिलोत व आदित्य खिलारे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर आज खेळविण्यात आलेला पहिला सामना देसाई वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी बाद 125 धावा केल्या. त्यात आकाश कुलकर्णीने 2 चौकारासह 36, विराज हावेरीने 2 चौकारासह 21, आदित्य पाटीलने 2 चौकारासह नाबाद 19 तर अद्वैत साठेने 3 चौकारासह 18 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे पियुष गोहिलोतने 23 धावात 3 तर आदित्य पाटील, प्रेम पाटील, कुनाल शानभाग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमी ड्रॉपईन वॉरियर्सने 25 षटकात 4 गडी बाद 125 धावाच केल्या. हा सामना टाय झाला. त्यात पियुष गोहिलोतने 1 षटकार 3 चौकारासह 56, उत्कर्ष शिंदेने 1 षटकार 2 चौकारासह 30 तर प्रेम पाटीलने 17 धावा केल्या. देसाई वॉरियर्सतर्फे अद्वैत साठेने 28 धावात 2 तर आदित्य पाटीलने 1 गडी बाद केला. सामना टाय झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला.
दुसऱया सामन्यात सीसीआय ब्लूने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 8 गडी बाद 92 धावा केल्या. त्यात मयुरेश मंडलिकने 29, प्रथम कुरणेने 15, तर तनिष्क जैनने 11 धावा केल्या. ए. जे. स्पोर्ट्स तर्फे आदित्य खिलारेने 10 धावात 4 तर सोनन निलवर्णे, कुशल कुटे, लक्ष वेर्णेकर यांनी प्रत्येकी 1 गाडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ए. जे. स्पोर्टसने 11.3 षटकात 1 गडी बाद 93 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. त्यात जित गदीयाने 1 षटकार 6 चौकारासह नाबाद 53 तर गौरव कांटेने 3 चौकारासह नाबाद 23 धावा
केल्या.
जित व गौरव यांनी दुसऱया गडय़ासाठी 67 धावांची नाबाद भागीदारी केली.
सीसीआयतर्फे अंश सोनवालकर याने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे संजय मोरे, रोहित पोरवाल, विक्रम देसाई, शिवाजी नेसरीकर यांच्या हस्ते पियुष गोहिलोतला, दुसऱया सामन्यात रविंद्र मंडलिक, अमर सरदेसाई, राजेंद्र मेलवंकी, चंदर कुंदरनाड यांच्या हस्ते आदित्य खिलारेला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
बुधवारचे सामने
गोकाक ग्लॅडिएटर्स वि. एक्सेस इलाईट हुबळी सकाळी 9.20 वा. 2) आनंद अकादमी ड्रॉपईन वॉरियर्स वि. ए. जी. ए. स्पोर्ट्स