प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील ऐनवरे येथे चार जनावरांची वाहतूक करणाऱया बोलेरो टेम्पो चालकावर पोलिसांनी कारवाई केली. या पकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी बोलेरो टेम्पो जप्त केला असून दोन बैल, एक गाय व एका वासराला ताब्यात घेतले आहे.
या पकरणी गणेश मधुकर मोरे, रा†शद उस्मान बेबल (रा. ऐनवरे, खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालणाऱया हेडकाŸन्स्टेबल सत्यवान मयेकर, रवींद्र बुरटे, नीलेश माने यांना ऐनवरेत बोलेरो टेम्पो संशयास्पदरित्या उभा असलेला आढळला. त्यानुसार चौकशी केली असता टेम्पोत 4 जनावरे असल्याचे ा†नदर्शनास आले. यामुळे टेम्पोसह असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. तसेच टेम्पो जप्त केला असून जनावरेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.