ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सोमवारी रात्री जागतिक आर्थिक परिषदेच्या अजेंडा बैठकीत बोलताना टेलिप्रॉम्पटर अचानक बंद झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गोंधळ उडाला. आर्थिक वाढ कायम राखत भारताने कोरोनासोबत कसा लढा दिला, हे जगभरातील देशांना मोदींनी यावेळी सांगितले. तसेच भारतीयांची स्मरणशक्ती कशी चांगली आहे, हे सांगत असतानाच टेलिप्रॉम्पटर बंद झाल्याने मोदींचा गोंधळ उडाला आणि त्यांना भाषण देता देता थांबावे लागले.
दावोसमध्ये झालेल्या या भाषणावेळी टेलिप्रॉम्पटरमध्ये तांत्रिक अडचणीमुळे व्यत्यय आला. तेव्हा मोदींचा काही क्षण गोंधळ उडाला आणि त्यांना भाषण थांबवावे लागले. त्यांनी राग आवरत आपल्या डाव्या बाजुला बघून दोन्ही हातही वर केले. त्यानंतर कानात हेडफोन घालून समोर असलेल्यांना ऐकू येतंय ना असा प्रश्न विचारला. यावेळेत टेलिप्रॉम्पटर पुन्हा सुरु झाल्यानंतर मोदी यांनी पुन्हा त्यांचं भाषण पहिल्यापासून सुरु केलं.
दरम्यान, या सर्व प्रकारावर काँग्रेसने तोंडसुख घेतले आहे. ”हमे तो टेलिप्रॉम्टरने लूटा, अपनो में कहा दम था”, असा निशाणा काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटरवरुन साधला.