कर्मचारी संपावर गेल्याने शाखा बंद
प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘मण्णपुरम’ गोल्ड लोन कंपनीचे कर्मचारी संपावर गेल्याने ऐन लग्नसराईत अनेक ग्राहकांचे दागिने अडकून पडले आहेत़ यामुळे महिलावर्गामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, मण्णपुरमच्या बहुतांश शाखाच बंद असल्याने नेमका संपर्क साधायचा कुणाशी, असा प्रश्नही सर्वसामान्यांना पडला आह़े विशेष म्हणजे याची साधी खबरबातही संबंधित खात्याला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱयांच्या वेतनामध्ये कपात करण्यात आल्याच्या निषेधार्थ मण्णपुरम कामगार सेना या संघटनेच्यावतीने 18 नोव्हेंबरपासून हा संप पुकारण्यात आला आह़े त्यामुळे जिह्यातील मण्णपुरमच्या सर्वच शाखांच्या कामकाजावर परिणाम झाला आह़े बहुतांश शाखांना टाळे लागल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
मण्णपुरम कंपनीमध्ये अनेक लोक सोने तारण ठेवून कर्ज घेत असतात़ सध्या लग्नसराई व विविध कार्यक्रमांना सुरूवात झाल्याने तारण ठेवलेले दागिने परत मिळवण्याकडे या नागरिकांचा कल आह़े मात्र कंपनीचे कार्यालय बंद असल्याने ग्राहकांना जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आह़े या वादावर लवकरच तोडगा काढण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े
लॉकडाऊननंतर आर्थिक मंदीचे कारण देत कंपनीकडून कर्मचाऱयांच्या वेतनामध्ये कपात केली होत़ी मात्र अनलॉकनंतर विविध कर्मचाऱयांचे पूर्ण पगार सुरु झाले. त्याचप्रमाणे मण्णपुरमच्या कर्मचाऱयांनाही पूर्ण वेतन मिळावे, अशी मागणी कामगार सेनेकडून करण्यात आली आह़े त्यासाठी राज्यभर चालू असलेल्या संपाचा रत्नागिरी जिह्यातही परिणाम दिसून येत आह़े कंपनीने कर्मचाऱयांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा आरोप कामगार सेनेकडून करण्यात आला आह़े कर्मचाऱयांची पगारवाढ रोखून धरण्यात आली आह़े अन्य राज्यात व शहरात कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात येत आहेत़ हक्कांच्या सुट्टया काढून घेण्यात आल्या असून बळजबराने पगारामध्ये कपात करण्यात येत असल्याचे आरोप कामगार सेनेकडून करण्यात येत आहेत.
अधिकारीच अनभिज्ञ?
‘मण्णपुरम’मध्ये कर्मचाऱयांचा संप सुरु आहे. अनेक शाखा चक्क बंद आहेत. यामुळे ग्राहकांना हेलपाटे पडत आहेत त्यामुळे नाहक मनस्ताप होत आहे. मात्र याची साधी खबरबातही कामगार खात्याला नसल्याचे दिसून आले. काही ग्राहकांनी या विभागाशी संपर्क साधला असता या संपाबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगत कर्तव्यतत्परतेचा अजब नमुना पेश केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत मण्णपुरम प्रशासनाने तातडीने खुलासा करतानाच पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.