नवी दिल्ली
पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरपासून टीव्ही संचाच्या किंमती वाढणार असल्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे. ओपन सेल पॅनेल्सवरील 5 टक्के आयात शुल्काची सवलत या महिन्याअखेर संपत आहे. ऑक्टोबरपासून आयातशुल्क आकारले गेल्यास टीव्हींच्या किमती वाढतील. टीव्ही संच बनवणाऱया कंपन्यांवर सध्या दबाव वाढताना दिसतो आहे. आयात शुल्काची सवलत बंद होणार असल्याने टीव्ही संचाची किंमत ऑक्टोबरपासून वाढण्याची शक्यता आहे. पूर्णपणे तयार पॅनेल्सच्या किमतीत 50 टक्के इतकी वाढ झाली असल्याचेही सांगण्यात येते. 32 इंची पॅनेलची किंमत 34 रुपये डॉलरवरून वाढून 60 रुपये डॉलर इतकी झाली आहे. टीव्ही निर्मात्यांमध्ये गुंतवणूकीचा ओघ वाढावा म्हणून सरकारने आयात शुल्कात सवलत देऊ केली होती. म्हणूनच सॅमसंगने आपला निर्मिती उद्योग व्हिएतनाममधून भारतात हलवला. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय सवलतीला मुदतवाढ देऊ शकते, असेही काही जाणकारांनी सांगितले आहे.