नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून घसरणीचा प्रवास करणारे वाहन क्षेत्र सध्या तेजी पकडत आहे. ऑक्टोबर महिन्यातील विक्रीच्या आकडय़ाने मरगळेले वाहन क्षेत्र नव्याने भरारी घेण्यास सज्ज झाल्याचे दिसून आले आहे. या कामगिरीत देशातील कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकी इंडियाची विक्री ऑक्टोबरमध्ये 18.9 टक्क्यांनी वधारुन 1,82,448 वर राहिली आहे. देशातील बाजारात हा आकडा 19.8 ने तेजीत राहून 1,72,862 वर स्थिरावला आहे. समीक्षकांच्या माहितीनुसार कंपनीच्या मिनी कार आल्टो व एस प्रेसो यांची विक्री काहीशी घटली आहे. एजी मोटार इंडियची किरकोळ विक्री ऑक्टोबरमध्ये सहा टक्क्यांनी वधारुन 3,750 वर पोहोचली आहे. यामध्ये एसयूव्ही हेक्टरचा विक्रीचा आकडा ऑक्टोबर महिन्यात 3,625 वर राहिला आहे. हय़ुंदाईने आतापर्यंतच्या कामगिरीत सर्वाधिक विक्री प्राप्त करत ऑक्टोबरला एकूण 56,605 वाहन विक्री केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यातीचा आकडा हा 12,230 राहिला आहे. टोयाटा किर्लोस्कर मोटारची ऑक्टोबरची विक्री ही 12,373 युनिटवर राहिली आहे. मागील वर्षात समान महिन्यात हा आकडा 11,866 इतका देशातील बाजारातील विक्रीतून प्राप्त केला होता. यामध्ये इटिओस गाडीची निर्यात 744 इतकी केली होती.
Previous Articleग्रामीण प्रादेशिक बँकांना सरकारकडून 670 कोटीचे भांडवल
Next Article काही महिन्यांनी पुन्हा कोरोनाची लागण शक्य
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.