मागील वर्षाच्या तुलनेत समाधानकारक स्थिती
नवी दिल्ली
भारताच्या सेवा क्षेत्राचा वेग हा ऑक्टोबरमध्ये मागच्या 10.5 वर्षाच्या तुलनेत सर्वात तेजीत राहिला असल्याची बाब समोर आली आहे. एका मासिक सर्व्हेक्षणातून दिलेल्या माहितीनुसार अनूकूल मागणीमुळे व्यवसायांमध्ये गती येताना दिसली आहे. याचा सेवा क्षेत्राला चांगला लाभ उठवता आला असल्याची माहिती आहे.
भारताचा सेवा व्यवसाय निर्देशांक हा ऑक्टोबर महिन्यात वधारुन 58.4 वर पोहोचला आहे. तो सप्टेंबरमध्ये 55.2 वर राहिला असल्याची नेंद आहे.
सर्व्हेक्षणामध्ये नवनवीन व्यवसायांमध्ये वाढ होत असल्याची बाब अधोरेखीत झाली आहे. उत्पादनामध्ये मागील एक दशकापेक्षा अधिक तेजी दिसली आहे. यासोबतच रोजगारामध्ये या दरम्यान वाढ झाली असल्याची बाबही समोर आली आहे.
सलग तिसऱया महिन्यात तेजी
सलग तिसऱया महिन्यात सेवा क्षेत्राचे उत्पादन वाढलेले आहे. 50 च्या वर निर्देशांक राहिल्याचे दिसून आले आहे. हा सलग तिसरा महिना सेवा क्षेत्र तेजीत राहिले आहे. आगामी काळातही ही परिस्थिती बदलत जाणार असल्याचे आयएचएस मार्केटचे सहसंचालक अर्थशास्त्र पोलिएन्ना डि लिमा यांनी सांगितले आहे.