ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ऑक्सफर्डच्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला आजपासून भारतात सुरुवात होणार आहे. सिरमचे शासन व नियामक विषयांचे अतिरिक्त संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली.
कोरोना लसीच्या उत्पादनासाठी ऑक्सफर्डने भारतातील सिरम इन्स्टिट्यूटसोबत करार केला आहे. या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला 3 ऑगस्ट रोजी परवानगी दिली आहे. 17 वेगवेगळ्या ठिकाणी या चाचण्या होणार आहेत.
आजपासून (दि.25) भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला प्रारंभ होणार आहे. तसेच दिल्लीतील एम्स, राजेंद्र मेमोरियल इन्स्टिट्यूट पाटणा, बी जे मेडिकल कॉलेज पुणे सह 17 ठिकाणी ही चाचणी घेण्यात येणार आहे. 18 वर्षावरील 1600 निरोगी नागरिक या चाचणीत सहभागी होणार आहेत.