ऑनलाईन टीम / हैदराबाद :
ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने हैदराबादेतील किंग कोटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे 7 रुग्णांना प्राणाला मुकावं लागल्याची दुदैवी घटना घडली.
किंग कोटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 7 कोरोना रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून कमी दाबाने पुरवठा होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे ऑक्सिजनची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र, ऑक्सिजन टँक भरण्यासाठी निघालेला टँकर रस्ता चुकला. रस्ता चुकलेल्या टँकरला मार्ग दाखविण्यासाठी नारयानगुंडा पोलिसांनी प्रयत्नही केले. मात्र, टँकर येईपर्यंत उशीर झाल्याने सात रुग्णांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं.