रत्नागिरी येथील शासकीय रूग्णालयात प्रकल्प, कोविड रूग्णांसाठी सुविधा,
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोविड रुग्णांना ड्युरा सिलेंडरद्वारा ऑक्सिजन पुरवठा करता यावा म्हणून साधन सामुग्री मागवण्यासाठी निविदा पकिया करण्यात आली. एकूण तीनवेळा निविदा काढून मोठासा पतिसाद मिळाला नाही. आता आलेल्या निविदांपैकी एका पुरवठादाराचे नाव अंतिम करण्यात येणार आहे. या आठवड्यात त्यावर निर्णय होईल.
जिल्हा शासकीय रूग्णालय येथील अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ड्युरा सिलेंडर प्लान्टच्या उभारणीसाठी सामुग्री पुरवण्यासाठी निविदा पकिया राबवण्यात आली. पहिल्या वेळी अपेक्षित पतिसाद मिळाला नाही म्हणून पहिली मुदत वाढ देऊन पकिया पुन्हा राबवण्यात आली. त्याहीवेळी अपेक्षित पतिसाद न मिळाल्याने दुसऱया मुदत वाढीची जाहिरात पसिध्द करण्यात आली. यावेळी दोन पुरवठादारांनी fिनविदा भरली आहे. यापैकी एकाचे नाव नक्की करण्यात येईल. जिल्हाधिकारी आपल्या कामावर हजर झाल्यावर म्हणजे या आठवड्यात त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
रत्नागिरी जिह्यात कळंबणी, ता. खेड आणि कामथे, ता. चिपळूण येथील रूग्णालयात ऑक्सिजन ड्युरा सिलेंडर प्लान्ट सुरु करण्यात आला. दोन्ही ठिकाणी खासगी सहकार्य असल्याने ही कामे मार्गी लागू शकली.