सरदार्स मैदानाजवळ खडेबाजार पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील सरदार्स मैदानाजवळ गांजा विकणाऱया दोन तरुणांना खडेबाजार पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्या जवळून एक ऑटोरिक्षा व 700 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
शाहीद सलीम पीरजादे (वय 21, रा. अशोकनगर), कमरुद्दीन दस्तगीर खलीफा (वय 25, रा. संभाजीनगर, वडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. खडेबाजारचे एसीपी ए. चंदाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धिरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
सरदार्स मैदानाजवळ ऑटोरिक्षात गांजा विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धिरज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर, हवालदार एस. एम. शिंदे, व्ही. एन. कंटीकर, बी. पी. उज्जीनकोप्प, पी. एस. सनमनी, शिवाप्पा, अबकारी उपअधिक्षक सी. एस. पाटील आदींनी छापा टाकून दोघा जणांना अटक केली. 9 हजार रुपये किंमतीचा 700 ग्रॅम गांजा, 70 हजार रुपये किंमतीचा ऑटोरिक्षा व 730 रुपये रोख रक्कम असे एकूण 79 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या दोघा जणांवर अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 20 (ब) कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला