सरकारमार्फत 3 हजारांची मदत मिळणार
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनमुळे संकटग्रस्त झालेल्यांसाठी राज्य सरकारने विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. याचा ऑटोरिक्षा, कॅब चालकांनाही लाभ मिळणार आहे. संबंधितांनी याकरिता ‘सेवा सिंधू’ पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. गुरुवारपासून या सुविधेला सुरुवात झाली असून संबंधित चालकांनी अर्ज करावेत, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
लॉकडाऊन काळात वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, ऑटोरिक्षा, कॅब, टॅक्सीचालक मोठय़ा अडचणीत आले आहेत. अशा कठीण परिस्थितीत ऑटोरिक्षा, कॅब व टॅक्सी चालकांच्या मदतीसाठी राज्य सरकार धावून आले आहे. राज्य सरकारमार्फत 3 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. ही मदत लाभार्थीच्या थेट खात्यावर जमा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजमध्ये ऑटोरिक्षा, टॅक्सी व कॅब चालकांचा समावेश आहे.त्यामुळे त्यांना सरकारकडून मदत मिळणार आहे.
यासाठी वाहनचालक परवाना, वाहन नोंदणी क्रमांक, आधार व पॅनकार्ड लिंक असणाऱया बँक खात्याचा क्रमांक आवश्यक असून संबंधितांनी सेवा सिंधू पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावेत, असे कळविण्यात आले आहे. मागीलवषी लॉकडाऊन काळात ऑटोरिक्षा, टॅक्सी व कॅब चालकांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत देण्यात आली होती.