नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठे वाहनांसंबंधीचे प्रदर्शन ऑटो एक्स्पो पुढील वर्षी 13 ते 18 जानेवारी दरम्यान भरवले जाणार आहे. कोरोना महामारीमुळे यंदा हे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. यापूर्वीचे प्रदर्शन हे फेब्रुवारी 2020 मध्ये भरवण्यात आले होते. यंदा फेब्रुवारीत हे प्रदर्शन गेटर नोएडा येथे भरवण्यात येणार होते, पण कोरोनाच्या शक्यतेमुळे ते रद्द केले आहे. तेव्हा पुढील वर्षी 12 जानेवारीला ऑटो एक्स्पोचे औपचारीक उदघाटन होणार आहे.