प्रतिनिधी / सांगली
सांगली डिस्ट्रिक्ट सर्टिफाइड ऑडिटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सतीश भोसले यांची तर उपाध्यक्षपदी विजय चव्हाण यांची निवड झाली. असोसिएशनच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये नुतन निवडी करण्यात आल्या. अध्यक्षपदी एच. आर. शेलार होते.
या सभेत सचिवपदी सुनील भादवनकर तर खजिनदारपदी प्रतापराव पाटील यांची निवड करण्याचे निश्चित करण्यात आले. सचिव भादवणकर यांनी प्रास्ताविक केले. संतोष कुलकर्णी यांनी आभार मानले. सभेस बी. के. कुलकर्णी, रमेश शेळके, रफीक इनामदार, सुनील माने, सतीश बाटवकर, प्रमोद पाटील आदी. कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.