नवी दिल्ली
जर्मनीतील कार कंपनी ऑडीची नवी सुव्ह प्रकारातील क्यू 2 ही कार उत्सवी काळात भारतात लॉन्च होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरची नवी कोरी कार ऑक्टोबरच्या मध्यावर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात भारतीय बाजारपेठेत उतरवली जाणार असल्याची शक्मयता कंपनीकडून वर्तवली जात आहे. कंपनीच्या एका वरि÷ अधिकाऱयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑडीची नवी क्यू 2 ची भेट उत्सवी काळातच ग्राहकांना द्यायची आहे. कंपनी जर्मनीतून 2500 कार आयात करणार असून त्यासाठीची आवश्यक ती परवानगी सरकारकडून घेण्यात आली आहे. पहिल्यांदाच लक्झरी कार घेऊ इच्छिणाऱया तरुण युवावर्गाला ही गाडी पसंत पडेल, असा विश्वास कंपनीला वाटतो.