नागठाणे / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे अायोजित ‘थँक अ टीचर’ अभियानांतर्गत ऑनलाइन गीत वाचन स्पर्धेत गजानन शंकर वाईकर यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. ते केळवली (ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. विघ्नेश जोशी यांनी लिहिलेले व दत्तात्रय डोईफोडे यांनी संगीतबद्ध गीताचे त्यांनी सादरीकरण केले.त्यांना सुषमा वाईकर, सुनीता देवकर,अनुपमा दाभाडे, सीमा आहिरे, तब्बसुम डांगे, जितेंद्र आवळे, देवदास गायकवाड, संतोष लोहार, आदिनाथ कदम आदींचे सहकार्य लाभले. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, जयश्री शिंगाडे, रमेश लोटेकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.