प्रतिनिधी/ रत्नागिरी
कर्ज देण्याच्या बहाण्याने ऑनलाईन गंडा घालणाऱया महिलेला शहर पोलिसांकडून अटक करण्यात आल़ी विद्या राजकुमार निंबाळकर (57, ऱा मुंबई) असे या महिलेचे नाव आह़े सोमवारी त्यांना शहर पोलिसांकडून न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडपेवठार येथील ओंकार संतोष निंबाळकर (ऱा खडपेवठार रत्नागिरी) यांना कर्ज मिळवून देण्यासाठी विद्या निंबाळकर व त्यांच्या सहकाऱयांनी फोन केला होत़ा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ओंकार व त्याच्या सहकाऱयांनी 11 लाख 60 हजार रूपये विद्या निंबाळकर यांनी सांगितलेल्या खात्यामध्ये जमा केले होत़े दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ओंकार याने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी
शहर पोलिसांकडून यापूर्वी विद्या निंबाळकर हिचा साथिदार धर्मेश कुवर (22, ऱा मुंबई) याला अटक केली होत़ी तर अन्य एक आरोपी विनोद लायरे हा अद्याप फरार आह़े